गुप्तेश्वर संस्थान शिर्ला येथे मंदिर जीर्णोद्धार,भव्य प्राणप्रतिष्ठा, महायज्ञ! अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरवात;अकराशेहुन अधिक भाविकांनी केले ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन!

हभप संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे भव्य सप्ताह.
 
Fhuy
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गुप्तेश्वर संस्थान शिर्ला (ता. खामगाव) येथे मंदिर जीर्णोद्धार,भव्य प्राणप्रतिष्ठा, महायज्ञ व अखंड हरिनाम सप्ताहाला आज  ५ मार्च पासून सुरवात झाली आहे. यामध्ये अकराशेहुन अधिक भाविकांनी श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन केले. तर पाच हजाराहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले . विदर्भरत्न रामयणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. 

यामध्ये दररोज सकाळी चार ते सहा काकडा ,विष्णुसहस्त्रनाम सकाळी ८ ते १२ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२ ते २ गाथा भजन ,दुपारी ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराज यांची श्री हरिकीर्तन सेवा राहील.

आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला स्वतः  हभप संजय महाराज पाचपोर, जागृती आश्रमाचे मठाधीपती हभप शंकर महाराज पेसोडे,श्री अक्षानंद महाराज यांची उपस्थिती होती.या भव्य कार्यक्रमाची सांगता १२ मार्च रोजी हभप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल.