'सत्यशोधक'ची टीम हास्य जत्राच्या स्टेजवर! उद्या पहा रात्री ९ वाजता

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सत्यशोधक चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. राज्यभर चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. दरम्यान सत्यशोधकची टीम ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता सोनी वाहिनीवरील हास्य जत्रा कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
रिलीज होण्यापूर्वीच सत्यशोधक चित्रपटाची सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. येत्या ५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाची टीम सर्वत्र प्रमोशन करण्यात गुंतली आहे. ३० डिसेंबर रोजी सोनी वाहिनीवरील हास्य जत्रा कार्यक्रमात सत्यशोधकचे निर्माता सुनील शेळके, आप्पा बोराटे, दिग्दर्शक नीलेश जळमकर, महात्मा फुले यांची भूमिका साकारलेले अभिनेता संदीप कुलकर्णी, गायिका वैशाली सामंत ,सुरेश विश्वकर्मा आदि सहभागी होणार आहेत. 
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे महान कार्य पाहिजे त्या प्रमाणात लोकांपर्यत पोहचलेले नाही. आतापर्यंत त्यांच्या जीवन कार्यावर केवळ एकच चित्रपट आलेला आहे. चित्रपट हे समाजप्रबोधनाचे सक्षम माध्यम आहे. सत्यशोधक चित्रपटातून महात्मा फुले यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचणार असून हा चित्रपट सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल, असा विश्वास निर्माता सुनील शेळके यांनी व्यक्त केला.