Amazon Ad

बदलीसाठी शिक्षकांनी घेतल्या "दिव्यांगांच्या" कुबड्या? फिटनेस प्रमाणपत्र असल्याशिवाय बदली करू नये!शिवसंग्रामने रेटली मागणी

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गुरुजींचे हातपाय शाबूत आहेत.गलेलठ्ठ पगारामुळे धडधाकट शरीर आहे. तरीही जिल्हा परिषदेत जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून लाभ लाटल्याचा आरोप होतोय. त्यामुळे बोगस शिक्षकांच्या प्रमाणपत्राऐवजी त्यांचे शारीरिक दिव्यंगत्व तपासण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान फिटनेस प्रमाणपत्र सक्षमीकरणांच्या चौकशी शिवाय दिव्यांग बांधवांच्या (एक) संवर्गातील शिक्षकांची बदली करू नये, अशा मागणीचे निवेदन शिवसंग्राम संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.

Lingade

     (जाहिरात👆)

जिल्हा परिषदेत कार्यरत दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांच्या पालकांना (एक) संवर्गात शासनाच्या परिपत्रकानुसार, या संवर्गातील शिक्षकांना बदली मध्ये सवलत दिली जाते. प्राधान्याने त्यांच्या सोयीनुसार बदली करण्यात येते. मात्र या दिव्यांगांचा लाभ बोगस प्रमाणपत्र सादर करून काही शिक्षक लाटत असल्याचा आरोप होत आहे. असे झाल्यास प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय केल्यासारखे होईल.

दरम्यान जिल्हा परिषद सीईओ यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेशित केले आहे. परिणामी ज्या कोणी शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केले असतील तर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार निश्चित राहील. याच पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेचे देऊळगाव राजा तालुक्याचे पदाधिकारी राजेश इंगळे, अजमत खान, जहीर खान यांनी फिटनेस प्रमाणपत्र सक्षमीकरणाशिवाय बदली आदेश देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा जिल्हा परिषद कार्य प्रणालीच्या विरुद्ध आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.