जिल्ह्यातले तलाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!एका दिवसाचे धरणे आंदोलन; काय आहेत मागण्या?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघाच्या वतीने आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तलाठी संवर्गातील प्रस्तावित बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा आणि प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या,जिल्हास्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून उपविभाग स्तरावर आस्थापना बदली प्रक्रिया संदर्भात सुलभ करण्यात यावी यासह आर्थिक व सेवा विषयक मागण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील तलाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. 
या आहेत मांगण्या..
- अ) मा. विभागीय आयुक्त, अमरावती यांचे कडे मान्यतेसाठी प्रस्तावित तलाठी संवर्गाच्या बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा. / प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या.
* नियतकालिक बदलीस पात्र तलाठी यांचे समुपदेशनाद्वारे बदली करण्यात यावी.
* बदलीस इच्छुक तलाठी यांची विनंती व आपसी बदली करण्यात यावी.
* जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून पूर्वी प्रमाणे उपविभाग स्तरावर आस्थापना ठेवण्यात येऊन उपविभागांतर्गत बदली प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
* जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
* सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना नविन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावे.
* सन २०१९ पासून प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे तत्काळ अदा करण्यात यावे.
* प्रलंबित नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाचा प्रशासकीय खर्च (०.०२५%) लवकरात लवकर अदा करावा.
* डेटा कार्डचे इंटरनेट वापराचे अतिरिक्त साझा चे शुल्का लवकरात लवकर अदा करण्यात यावे.
* ई चावडी- ऑनलाईन वसुली साठी व इतर सबंधित कामकाजासाठी सक्ती व दबावतंत्राचा वापर न करणे बाबत.
* लोकसभा निवडणूक मानधन, कृषिगणना मानधन व मराठा आरक्षण सव्र्व्हेक्षण मानधन तात्काळ अदा करण्यात यावे.
* नायब तहसीलदार पदासाठी तलाठी / मं. अ. यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.