तलाठी झाले आता चिखली तालुक्यातील सरपंचांचे काम बंद आंदोलन! काय आहे कारण? वाचा....

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील आठवड्यात विविध मागण्यांसाठी तलाठ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. आता चिखली तालुक्यातील सरपंच संघटनेने देखील आज,१६ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. सरपंच संघटनेच्या विविध मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी हे आंदोलन करीत असल्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतेकर यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.
 आज,१६ ऑगस्ट रोजी सतीश भुतेकर यांच्या नेतृत्वात चिखली पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांना काम बंद आंदोलनाचे व मागण्यांचे पत्र देण्यात आले. नियमित व सन्मान जनक मानधन व भत्ता मिळावा.
सरपंचांना १५ हजार, उपसरपंचांना १० हजार तर सदस्यांना ३ हजार मानधन मिळावे. मुंबईत सरपंच भावनांची स्थापना करावी, लागणार ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे,ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक पूर्ण वेळ करून वेतन निश्चिती करावी.संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधनात आणावे अशा मागण्या घेऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यास आले आहे.