नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सिंदखेड राजात लाक्षणिक उपोषण! वन बुलडाणा मिशनचा तहसिलसमोर ठिय्या

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात आज येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सिंदखेड राजा तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, सोलर पॅनल नुकसानीसाठी १ लाखाची अतिरिक्त मदत द्या, शेडनेट नुकसानीचा 'एनडीआरएफ'मध्ये समावेश करावा, शेडनेट नुकसानग्रस्त शेतकऱ्याला १ लाख रुपये द्या , नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायतीसाठी एकरी ५० हजार, कोरडवाहूसाठी एकरी २५ हजार तत्काळ मदत द्या आदी मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले. 
तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने मंजूर करुन न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यानी केली. प्रभारी तहसीलदार गणेश नागरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी तानाजी भोपळे, संदीप घोंगडे, प्रदीप शेळके, सचिन भुतेकर, बालाजी सोसे, सचिन दाभाडे, किशोर पाडमुख, मदन म्हस्के, सचिन गव्हाड, गुलाबराव भूतेकर, सुरेश भुतेकर, रामेश्वर ढगे, अनंता कुरंगळ, चंदू भुतेकर, गजानन भुतेकर, राजेंद्र भोपळे आदींची उपस्थिती होती.