चिखली तालुका पशुसंवर्धन कार्यालयात मेलेली बकरी घेऊन स्वाभिमानीच्या विनायक सरनाईक ,नितीन राजपुतांचा राडा! चुकीच्या उपचाराने बकरी दगावली; नुकसान भरपाईची मागणी

 
Hdhxh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील तालुका पशुसंवर्धन कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज,१३ जून रोजी अधिकाऱ्यांना घेराव घातला. कोलारा येथील एका शेतकऱ्याची बकरी चुकीच्या उपचाराने दगावली, त्यामुळे संतप्त झालेल्या विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत मेलेली बकरी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या दालना टाकली.
Fgvv
कोलारा येथील शेतकरी भीमराव नामदेव दुतोंडे यांनी त्यांची बकरी शासकीय डॉ. तायडे मॅडम यांच्याकडे उपचारासाठी नेली होती. बकरी गाभण राहत नसल्याने त्यावर उपचार करायचा होता, मात्र डॉ.तायडे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे ठणठणीत असलेली बकरी दगावली. ही बाब शेतकऱ्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांना कळवली. त्यामुळे शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी यासाठी त्यांनी मेलेली बकरी तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या दालनात टाकली आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला मदत मिळत नाही आणि चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टर वर कारवाई होत नाही तोपर्यंत पशुसंवर्धन कार्यालयातून उठणार नसल्याची भूमिका सरनाईक आणि राजपूत यांनी घेतली आहे.