दुकानावर दोन महिन्यांच्या आत मराठी पाट्या लावा कोर्टाचा 'सुप्रीम' निर्णय; मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे म्हणाले,...अन्यथा मनसे दोन मिनिटही थांबणार नाही

 
manse
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्यवसायिकांनी प्रतिष्ठानचे फलक (पाट्या) मराठी भाषेत लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला. सोमवार २५ सप्टेंबर रोजी न्यायालयाने तमाम व्यवसायिकांना  दोन महिन्यांच्या आत मराठी भाषेत पाट्या लावा असे आदेश निर्गमित केले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरतुदीप्रमाणे दोन महिन्यांच्या कालावधीत मराठी पाट्या लावल्या नाहीत तर मनसे दोन मिनिट सुद्धा थांबणार नाही, असा कडक इशारा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्यासह  बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 

जिल्ह्यातील सर्व व्यापारी व इतर दुकान मालकांनी या निर्णयाचे स्वागत करून मराठी बाणा जपावा. आपल्या दुकानावर, मॉलवर, ऑफिसवर मराठी भाषेत स्पष्टपणे दिसतील अशा पाट्या लावाव्यात. असेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना कळविण्यात आले आहे.