अचानकपणे रस्त्यात मोटरसायकलवर धडकला 'श्वान', सुदैवाने अंचरवाडीच्या गुरुजींचे वाचले प्राण! बेराळा फाट्यावरील घटना..

 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सकाळची शाळा आटोपून घरी जात असताना रस्त्यात अचानकच दुचाकी समोरून एक श्वान धडकला. दुर्दैवाने श्वान गाडीने उडविला तर दुचाकीस्वार दोन शिक्षक खाली पडून गंभीर जखमी झाले. चिखली देऊळगाव राजा मार्गावरील बेराळा फाट्यावर ही घटना घडली. 

   बुधवार, ३ जुलैला सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी फाट्यावरून दोघे शिक्षक मोटरसायकलने येत होते. बबन राठोड आणि प्रशांत राठोड हे अंचरवाडी येथील शिवाजी आश्रम शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सकाळची शाळा आटोपून चिखलीकडे दोघे येत होते. दरम्यान, बेराळा फाट्यानजीक एक श्वान (कुत्रा) अचानकच रोडवर धावून आला. शिक्षकांची दुचाकी भरधाव वेगाने आली आणि श्र्वाणाला धडकली. यात तो काही अंतर पुढे फेकल्या गेला तर दोन्ही शिक्षक जोरदारपणे खाली कोसळले. दोघांना जबर दुखापत झाली. सुदैवाने, दोन्ही शिक्षकांचे प्राण वाचले. अचानकपणे ब्रेक लागल्याने शिक्षक खाली कोसळले होते, यामध्ये डोक्याला मार लागला असता तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असती. हा प्रकार पाहून रस्त्यावरील काहीजण थांबले. शिक्षकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.