SUCCESS STORY कोण म्हणतं नीट च्या तयारीसाठी कोटा अन् लातूरलाच जावं लागतं? बुलडाण्याची साक्षी सुसर म्हणते, हे सगळ बुलडाण्यातच शक्य आहे की!

"बुलडाण्याच्या करिअर पॉइंट कोटा" चा साक्षीच्या यशात आहे मोठा वाटा..

 
pawar classes
बुलडाणा(वाणिज्य प्रतिनिधी/बुलडाणा लाइव्ह): हो, डॉक्टर,  इंजिनिअर व्हायचं म्हटल की लाखोंचा खर्च अन् छत्रपती संभाजीनगर, लातूर ,कोटा शिवाय पर्यायच नाही असा समज अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये होता. त्यामुळे सामान्य शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांनी तर डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहणेही गेल्या काही काळात सोडून दिले होते. मात्र, या भ्रमाला छेद देण्याचे काम केलय ते बुलडाणा येथील "करिअर पॉइंट कोटा" ने. बुलडाणा शहरात राहून NEET ची चांगली तयारी करता येते आणि परीक्षेत घवघवीत यश देखील मिळवता येते हे करिअर पॉइंट कोटा ,बुलडाणा शाखेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय. त्यापैकी एक आहे, साक्षी सुसर..! साक्षी सध्या पुण्याच्या अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. "बुलडाणा लाइव्ह" शी चर्चा करतांना साक्षीने तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं. श्री डाॅ.भालके सर, श्री.पवार सर यांच्यासारखे पाठीराखे असल्यावर यश तुमच्यापासून कुणीच हिसकावून घेऊ शकत नाही. शेकडो किलोमीटर अंतरावरील राजस्थानच्या कोटा मध्ये जे मिळत तेच आता बुलडाण्याच्या "करिअर पॉइंट कोटा" मधून मिळत अस साक्षी सांगते.
 

 श्री. डाॅ.भालके सर आणि श्री. पवार सरांच्या संकल्पनेतून कोविड काळात "करिअर पॉइंट कोटा" बुलडाणा शाखेची सुरुवात झाली. दिल्ली, कोटा येथील नामवंत आणि अनुभवी प्राध्यापकांची टीम करिअर पॉइंटच्या कामासाठी नियुक्त करण्यात आली. साक्षी शालेय जीवनात व १० व्या वर्गात देखील श्री. पवार सायन्स क्लासेसची विद्यार्थिनी होती. १० वी नंतर तिच्यासमोरही कोटा, लातूर असे पर्याय होतेच मात्र तिने बुलडाण्यात राहुन श्री. डाॅ.भालके सर आणि श्री. पवार सरांनी सुरू केल्याल्या करियर पॉइंट मध्ये NEET ची तयारी करायचे ठरवले.
     
करियर पॉइंट कोटा मुळे पहिल्याच प्रयत्नात यश...!

  साक्षी डाॅ.भालके सर आणि पवार सरांचे मनापासून आभार मानते.  करियर पॉइंट मध्ये उत्कृष्ट मार्गदर्शन आणि सर्वोत्तम गुरुजन लाभल्याचे ती सांगते. "करिअर पॉइंट च्या कार्यालयीन टीम ने देखील मला माझ्या प्रवासात मदत केली. या सर्वांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्यानेच मी NEET ची परीक्षा पहिल्या प्रयत्नात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करू शकले" असे साक्षी सांगते. करियर पॉइंट चे NOTES, TEACHING MATERIAL आणि शिक्षकांनी क्लासमध्ये केलेले उत्कृष्ट लेक्चर्स या सगळ्यांमुळे NEET ची नीट तयारी झाली असेही साक्षी सांगते. १० विला स्टेट बोर्डाची विद्यार्थिनी असून देखील मला NEET ची तयारी करताना कोणतीही उणीव करिअर पॉइंट  कोटा च्या  शिक्षकांनी जाणवू दिली नाही. करिअर पॉइंटची शिकवण्याची पद्धत , विद्यार्थ्यांकडून नेमकी तयारी करून घेण्याची पद्धत खूपच भारी असेही साक्षी म्हणते. करियर पॉइंट मुळेच मला पहिल्याच प्रयत्नात ५५२ गुण मिळाले, आज मी पुण्यासारख्या शहरात अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सारख्या चांगल्या कॉलेज ला प्रवेश मिळवू शकले. माझ्या आई -वडिलांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे असेही साक्षी म्हणाली.
    
अभ्यासात सातत्य असेल तर यश दूर नाही. मात्र तुम्हाला मार्गदर्शन कोण करतंय यावर बरच काही अवलंबून असत असं साक्षी म्हणते. अधिकचे पैसे खर्च करून दूरच्या शहरात गेल्यापेक्षा आपल्याच बुलडाणा शहरात असलेल्या करिअर पॉईंट मध्ये तयारी करणे कधीही फायद्याचेच ठरेल असे साक्षी NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते. लातूर ,कोटा इथे जे मिळत तेच किंवा त्याहीपेक्षा चांगल देण्याचा प्रयत्न करिअर पॉइंट कोटा च्या बुलडाणा शाखेतून होत असल्याचे साक्षी सांगते.

करिअर पॉइंट कोटा, विष्णूवाडी, गजानन महाराज मंदिराजवळ बुलडाणा, संपर्क: 7020782965,