समृध्दीवर लघवी करायला थांबले अन् भरधाव ट्रकने उडवले! देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रसच्या मांटे कुटुंबातील बाप लेकांसह पुतण्याचा मृत्यू!

 
fghj
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृध्दी महामार्गावर आज,४ जूनच्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. लघवी करण्यासाठी थांबलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले तिघेही देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस येथील असून नात्याने बाप लेक आणि पुतण्या आहेत.
 

विजय शेषराव मांटे (४८),  तुषार गजानन मांटे (३२) आणि ओम विजय मांटे (२०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. वाशीम येथील नात्यातील एक विवाह सोहळा आटोपून ते मालेगाव कडे परतत होते. मेहकर तालुक्यातील फर्दापूर जवळच्या चॅनल क्र २८३ जवळ वाहन थांबवून ते लघुशंका करण्यासाठी जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या एका अज्ञात ट्रकने त्यांना उडवले. या अपघातामुळे डिग्रस गावावर एकच शोककळा पसरली आहे.