केंद्र शासनाच्या विरोधात लोणार काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन! खा. राहुल गांधीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप..!

 
congress
लोणार( प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपा हुकूमशाही वृत्तीने वागत खा.राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत केंद्र शासनाच्या विरोधात लोणार काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 
 

भाजपने राहुल गांधींच्या विरोधात ठिकठिकाणी खटले रचून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरात मधील सुरत न्यायालयाने खा.राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा सुनावली, त्याचा निषेध काँग्रेसच्या वतीने करण्यात येतोय. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार  जिल्हाभर काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. लोणार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेश मापारी, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सेवादल प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रकाश धुमाळ, शांतीलाल गुगलीया, साहेबराव पाटोळे, बादशाह खान, गजानन खरात, अनिकेत मापारी, संतोष मापारी, रामचंद्र कोचर, पंढरी चाटे, शेख अस्लम शेख कासम, तोसीफ कुरेशी, माजीद कुरेशी, शेख जुनेद शेख करामत, अंबादास इंगळे, आप्पा रामा शिंदे, शुभम साठे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.