चिखलीच्या डॉक्टरसोबत चुकीचं घडलं..! पान खायला गेले अन्....

 
डॉक्टर
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीतील भालगाव फाट्यावर डॉ. स्वप्निल भराड पान खाण्यासाठी गेले होते. पान खाणे त्यांना चांगलेच महागात पडले. रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने तब्बल दीड लाखाचे नुकसान झाले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर २१ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला.
२० जानेवारीच्या रात्री चिखलीतील डॉक्टर स्वप्नील भराड भालगाव फाट्यावर पान करण्यासाठी गेले होते, कधीतरी ते चारचाकी ने प्रवास करतात. असे तक्रारीत म्हटले आहे, त्यादिवशी त्यांची (एम एच २८ वी ८२६७ क्रमांकाची) चार चाकी (स्विफ्ट डिझायर) त्यांनी सोबत नेली. पान खाल्ल्यानंतर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून लघुशंकेसाठी गेले . मात्र तितक्याच एम एच २८ बीजी १०६० क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या चार चाकी वाहनाला मागून धडक दिली. त्यामध्ये गाडीची डिक्की व इतर भागात एकूण दीड लाखापर्यंतचे नुकसान झाले. दुचाकी चालकावर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस करत आहेत.