बसमध्ये चढताना महिलेसोबत वाईट घडलं ! देऊळगाव राजा पोलिसांत दिली तक्रार..
May 30, 2024, 10:28 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत लंपास झाल्याची घटना देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस स्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञाताने पर्समधील ३० हजार १६५ रुपयांची पोत लंपास केली. अशी तक्रार अलकनंदा बोबडे रा. पापळ ता. जाफ्राबाद जि. जालना यांनी देऊळगाव राजा पोलिसांत दिली. शिर्डी कारंजा बसमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत ही वाईट घटना घडली. पर्समध्ये शोधूनसुद्धा पोत सापडली नाही, त्यामुळे पोत चोरीला गेल्याची महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी बस स्थानकात मोठी गर्दी होती कोणी तरी अज्ञात चोरट्याने पोत चोरी केली असावी या शंकेतून महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.