‘सैनिकहो तुमच्यासाठी’! सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अतिमहत्वाची बातमी!
Aug 3, 2024, 13:41 IST
बुलडाणा( जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरात महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, विरपिता यांच्यासाठी शनिवार, दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील संबधित तहसील कार्यालयामध्ये सेवेत असलेले सैनिक, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या महसूल संबंधित समस्या, दाखले, प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील आजी सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, विरपिता यांच्या महसूल संबधित अडचणी सोडविण्यात येणार आहे. यासाठी दि. ५ व ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सकाळी १२ वाजेपर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लिडर रूपाली सरोदे यांनी केले आहे.