गणेशोत्स मंडळांना समाजकल्याण विभागाचे आवाहन! जादूटोणा विरोधी देखावा दाखवा...

 
Fgbb
बुलडाणा(जिल्हा माहिती कार्यालय):येत्या काळात गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या काळात मंडळांनी जादूटोणा विरोधी देखावे करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
भारतीय समाजात रूजलेल्या अनिष्ठ प्रथांमुळे समाजाचे नुकसान झाले आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्‍ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम जारी करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळ, तसेच देवी मंडळांनी पोस्टर, चित्र, त्याअनुषंगाने देखावे निर्माण करावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.