मणिपूर घटनेचा सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध; जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने! कारवाईची मागणी ​​​​​​​

 
nished

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मणिपूर राज्यात गेल्या ४ महिन्यापासून हिंसक घटना घडत आहे. तसेच दोन गटातील वाद विकोपाला गेले आहेत. महिलावरील अत्याचार देखील कमालीचे वाढले असून तिथे महिलांना विवस्त्र करून बलात्कार केल्या जात आहेत. दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली.या अमानवी घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदविल्या जात आहे... आज बुलडाण्यातील सर्व पक्षीय व विविध सामाजिक संघटनेच्या असंख्य महीला पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीव्र निदर्शने करून  निषेध नोंदविला.

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.बंद करा बंद करा.. महिलांवरील अत्याचार बंद करा आदी घोषणा देण्यात आल्या.    दोषीना कडक शासन करा व अश्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारणे कडक पावले उचलावी अशी मागणी केलेले निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

स्त्री शक्तीला न्याय द्या--शाहिणाताई पठाण

ज्या देशात स्त्रीला नग्न करून तिची दिंड काढण्यात येऊन तिच्या देहाचे लचके तोडले जातात तिथे देशातील कायदा व सुव्यवस्था नक्कीच रसातळाला गेलेली आहे हे सिद्ध होते. पाषवी कृत्य करणाऱ्या नाराधामांवर त्वरित कार्यवाही झाली पाहिजे.आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून स्त्री शक्तीला जलदगती न्यायालयाकडून न्याय मिळावा. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सैतानी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना तातडीने गजाआड करावे अशी मागणी आज आम्ही विविध संघटनांच्या वतीने केली आहे.

 मन व्यथित करणारी घटना-  शोण चिंचोले

 घडलेली घटना मन व्यथीत करणारी आहे. महिलांची नग्न दिंड काढून पाषवी अत्याचार होणे फार दुर्दैवी आहे.आपण लोकशाहीत असतांनाअशा घटना पुन्हा परवडणाऱ्या नाहीत. या घटना घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.