बुलडाणा जिल्ह्यात ३ दिवस कत्तलखाने बंद! मांसविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; काय आहे कारण?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सप्टेंबर महिन्यातील तीन दिवस बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत. मांस विक्री देखील बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत. जैन धर्मियांचे पर्युषण पर्व व संवत्सरी निमित्त कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी जैन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  दिनांक ७ सप्टेंबर, ८ सप्टेंबर व १७ सप्टेंबर या दिवशी जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद राहतील. त्या दिवशी जिल्ह्यात कुठेही मांस विक्री करण्यावर देखील प्रतिबंध लावण्यात आले आहेत. भगवान महावीर स्वामी २५५० वा निर्माण कल्याणात महोत्सव समिती बुलडाणा द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना याआधी निवेदन देण्यात आले होते. आता ७ ,८ व १७ सप्टेंबर रोजी मांस विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.