उद्या सिंदखेडराजा बंद? सर्वपक्षीय बैठकीचे पोलिसांवर खापर! म्हणाले, आमची सुरक्षा धोक्यात...

 
दजंडणक
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा शहरामध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत. दरोडे व घरफोड्यांनी नागरिक वैतागले आहेत. सिंदखेडराजा पोलिसांचा चोरट्यांवर जरब नाही. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेली अवस्थेत तर काही पडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे नागरी सुरक्षेसाठी उद्या सिंदखेडराजा शहर बंद पुकारण्यात आला आहे. १ सप्टेंबरला शहरात झालेल्या एका सर्वपक्षीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला..
सिंदखेडराजा शहरात चोरी आणि दरोड्या सारख्या घटना वाढल्या आहेत. सिंदखेडराजा हे शहर ऐतिहासिक आहे, शेकडो पर्यटक या शहराला भेट देण्यासाठी येतात मात्र सुरक्षा व्यवस्था पोलीस विभाग कमी पडत आहे. शहरात गुंडांचा धाक वाढला आहे, काल दर्शनासाठी जाणाऱ्या एका आजी आणि नातवाच्या गळ्याला चाकू लावुन सोन्या-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. सातत्याने वाढणाऱ्या या घटनांमुळे पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा एकमुखी सुर या बैठकीतून उमटला. त्यामुळे उद्या ४ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.