सिंदखेड राजा शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा फटका! सावखेड तेजन येथे वीज पडली, म्हैस दगावली

 
nature

सिंदखेड राजा, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तालुक्यात रविवारी प्रचंड वाऱ्यासह वादळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सावखेड तेजन येथे वीज पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.

सावखेड तेजन येथील शेतकरी सुधाकर आनंदा विघणे यांच्या शेतात रात्री लिंबाच्या झाडाला बांधलेल्या म्हशीवर वीज पडल्यामुळे म्हशीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे जवळपास १ लाख ४ हजार रूपयाचे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच तलाठी एस. पी. झोरे व त्यांचे सहकारी राजेश जाधव व जनार्दन झोरे यांनी अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला आहे. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा व आंबा याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच शाळू ज्वारी व उन्हाळी बाजरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच फळझाडे व भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.