मंदिरासमोरच पाप! महिलेला एकटे पाहून, दोन तरुणांनी केले चुकीचे काम! चाकूचा धाक दाखवला अन्.. मेहकरची घटना..
Jul 15, 2024, 08:57 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मंदिराच्या कंपाऊंड मध्ये महिलेचा एकटेपणाचा फायदा घेत दुचाकीस्वार तरुणांनी चुकीचे काम केले. रविवारी सकाळी ८ वाजे दरम्यान मेहकर शहरातील ग्रामीण रुग्णालया नजीकच्या मंदिरासमोर ही घटना घडली.
मीनाक्षी जयहरी फुके असे तक्रारदार महिलेचे नाव असून, त्यांनी मेहकर पोलीसांत तक्रार दिली. मीनाक्षी फुके या नितीन युवाप्रमाणे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालयाच्या भिंती लगत असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या. यावेळी त्या मंदिराच्या कंपाउंडमध्ये एकट्या असल्याचा फायदा घेत २० ते २२ वर्षाचे धडधाकट दोन तरुण दुचाकीने तिथे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मीनाक्षी फूके ज्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कर्णफुले असे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याची दागिने लंपास केले. या प्रकाराने हादरून गेल्याने फुके यांनी आरडाओरड केली. परंतु दोन्ही चोरटे विना नंबर प्लेटच्या पल्सर कंपनीच्या दुचाकीने पसर झाले. यानंतर फुके यांनी तातडीने मेहकर पोलीस ठाणे गाठले. घडलेली सगळी हकीकत सांगितली. यावरून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधी अश्या काही घटना मेहकर शहरात दिसून आल्या. दिवसाढवळ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार होतात. लवकरात लवकर चोरट्यांची ओळख पटत नाही. यामुळे चोरी गेलेल्या साहित्याची रीकव्हवरी होणे कमी झाले आहे. मेहकर पोलिसांनी अश्या प्रकारांना गांभीर्याने घेतले पाहिजे. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.