मेहकर तालुक्यातील पोखरी चे स्वस्त धान्य दुकानदार जास्त दराने विकतात! जिल्हाधिकाऱ्यांकडे तरुणाची तक्रार...

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील पोखरी गावात स्वस्त धान्य दुकानदार जवंजाळ शासकीय दाराच्या तुलनेत गावकऱ्यांकडून अधिकचे दर घेतात.जाब विचारण्यासाठी घेल्यावर शिवीगाळ करून उडवाउडवीची उत्तरे देतात. या प्रकरणी प्रशासनाने त्यांच्याविरोधात योग्य कारवाई करावी अशी तक्रार गावातील आकाश वडतकर या तरुणाने निवेदनातून केली आहे. 
 यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पोखरी तांदूळ आणि किट अशात दोनच धान्याचे वाटप करण्यात येते. मध्यंतरी राशन दुकानदार विजय जवंजाळ यांना पावती का देत नाही, पैसे जास्त कसे असे विविध प्रश्न विचारले परंतु विजय जंवजाळ म्हटले "तुला जे लागले ते घेऊन जा परंतु गावकऱ्यांना सांगू नको" यावरुन गावकऱ्यांची आर्थिक लूट केल्या जात असल्याचे सिद्ध झाले. प्रशासनाने जंवजाळ यांचे लायसन्स रद्द करावे अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.