धक्कादायक; उधार दिलेले पैसे मागितले पण 'तो' जीवावर उठला! बुलढाण्यातील चांडक ले आऊट मध्ये २३ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला..

 
Sr
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उधारी पैशाच्या वादातून एकाने २३ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना चांडक ले आउट परिसरात घडली. याप्रकरणी समाधान रिंढे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
प्राप्त माहितीनुसार, शहरातील चांडक ले आउट परिसरातील रहिवासी ऋषिकेश निर्मळ याने आरोपी समाधानला दीड महिन्यांपूर्वी हजार रुपये दिले होते. दरम्यान, ९ जून रोजी दिलेले पैसे मागितले असता 'कोणते पैसे ' मी पैसे देणार नाही' असे म्हणत समाधानने शिवीगाळ केली. तुला काय करायचे ते कर असे सांगून तो त्याच्या घरात निघून गेला. त्यानंतर चाकू घेऊन बाहेर आला व ऋषिकेश निर्मळ याच्या अंगावर धावून गेला. चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ऋषिकेशने तो वार आपल्या हाताने अडवला. यात ऋषिकेशच्या हातावर जखम झाली असून डाव्या तळहातावर व गळ्याच्या डाव्या बाजूवर चाकू लागला आहे. असे त्याने दिलेल्या तक्रारीत सांगितले. तक्रारी वरून पोलिसांनी समाधान रिंढे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार रामकला सुरभे करत आहे.