"असोला मर्डर" प्रकरणात चक्रावून टाकणारे अपडेट! खून झालेली तरुणी विवाहिता! गळा आवळला, डोक्यात दगड टाकला नंतर तिच्या अंगावरचे कपडे चेहऱ्यावर टाकून पेटवले!

घटनास्थळी सापडले तुप अन् दिव्याची वात, काही अंतरावर नारळही सापडले..! तरुणीच्या उजव्या हातावर दिल चे चिन्ह, हातात केशरी धागा अन् लाल बांगड्या! बातमीत फोटो पहा अन् ओळखत असाल तर लगेच पोलिसांना कळवा....

 
मराठा
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील असोला शिवारात आज २३ जानेवारीच्या सकाळी संतापजनक घटना उघडकीस आली. चिखली ते अंचरवाडी दरम्यान असलेल्या असोला येथील राजवाडा ढाब्याच्या मागील बाजूस एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला..घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसपी सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मृतक तरुणी अनोळखी असल्याने तिची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या गोष्टी चक्रावून टाकणाऱ्या आहेत..
  Bangles
मृतक तरुणीचे वय अंदाजे १९ ते २५ या वयोगटातील असावे असा अंदाज आहे. तरुणीचा आधी गळा आवळण्यात आला, डोक्यात मागील बाजूला दगडाचा वार करण्यात आला, आणि तरुणीच्या अंगातील कपडे तिच्या चेहऱ्यावर टाकून जाळण्यात आले असे प्रथमदर्शनी दिसत आहे. तरुणीचा मृतदेह नग्न अवस्थेत आहे, तिला मारण्याआधी बलात्कार केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला..दरम्यान घटनास्थळी तूप आणि दिव्याची वात देखील सापडली आहे, त्यामुळे हे सगळे प्रकरण चक्रावून टाकणारे आहे. घटनास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यात एक नारळ देखील सापडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ओळख पटविण्याचे आवाहन...
Bangles
तरुणीच्या गळ्यात मंगळसूत्र आढळल्याने ती विवाहिता असावी, तिच्या उजव्या हातात केशरी धागा बांधलेला आहे तर त्याच हातावर दिलं चे चिन्ह असल्याचे आढळून आले. घटनास्थळी फुटलेल्या लाल बांगड्या देखील आढळून आल्या.तर नखांवर लाल रंगाचे नेलपॉलिश केलेले आहे..अशा वर्णनाची तरुणी/ विवाहिता ओळखीची असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..