धक्कादायक ! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बाळाचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप!

बाळाला झटके येत होते पण डॉक्टर तपासायला आलेच नाहीत..! दोन परिचारिकांना केले तडकाफडकी कार्यमुक्त 
 
Fjn
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहरातील धाड रोडवर असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात एका नवजात बाळाचा आज जन्मल्यानंतर ४ तासात मृत्यू झाला. नवजात बाळाला झटके येत होते मात्र बाळाला तपासायला जिल्हा स्त्री रुग्णालयात बालरोग तज्ञ डॉक्टरच नव्हते, डॉक्टर सकाळी येतील असे नवजात बाळाच्या आईवडिलांना सांगण्यात आले होते. अखेर रुग्णालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला. आज ९ मे च्या पहाटे ही घटना घडली. दरम्यान संतप्त नातेवाईकांच्या आक्रोशानंतर दोन परिचारिकांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
  Fvb
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील रहिवासी सलमा सदफ यांना प्रसूतीसाठी काल दुपारी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पोटातील बाळाचे हृदयाचे ठोके जास्त असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्याचे सांगितले, त्यानुसार गर्भवती सलमा सदफ यांना बुलढाण्यातील स्त्री रुग्णालयात रात्री उशिरा भरती करण्यात आले. त्यानंतर रात्री ठीक १:४० वाजता सलमा सदाफ यांनी नवजात बालिकेला जन्म दिला. त्यांनतर चार तासानंतर नवजात बाळाचे शरीर झटके देत होते. ते पाहून नुकतेच बाप झालेले सय्यद शफात यांच्यासह उपस्थित नातेवाईकांनी वार्डातील कर्मचाऱ्यांना आवाज दिले. त्यांच्याजवळ जावून बाळा विषयी अत्यंत धडपडीणे सांगत होते. शेवटी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान सय्यद शफात यांनी आपल्या बाळाला उचलले आणि रेफर लेटर ची मागणी केली. ते, मिळाताच त्यांनी सरकारी दवाखाना गाठले परंतु बाळाचे उपचार सुरू होण्याआधी बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान , या घटनेनंतर नातेवाईकांनी स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी तब्बल दोन तास बातचीत केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. शिवाय दोन परिचारिकेंना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांनतर प्रसूतीतज्ञ डॉक्टर, तसेच एक महिला कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. प्रकरणाचा पुढील अहवाल डॉ. प्रशांत पाटील तयार करत असून बालकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर निश्चितच कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेजबाबदार डॉक्टरांची नातेवाईकांना अरेरावी ! 
 
रात्री डॉ. योगेश शिंदे हे कर्तव्यावर असून देखील रुग्णापर्यंत पोहोचले नाही असा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आज मृतक बालिकेचे नातेवाईक त्यांच्याशी बोलत असताना डॉ. शिंदे यांनी अरेरावी असेही नातेवाईकांचे म्हणने आहे
Hfjf
प्रशासनाने चूक मान्य केली!.. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले, 
 यासंदर्भात मृतक बालकाच्या वडिलाने माहिती देताना सांगितले की, मध्यरात्री कर्तव्यावर असलेले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. याविषयी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना सांगितले असता प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे नमूद केले आहे.
हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडू नका: युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांची मागणी
 दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी तातडीने जिल्हा स्त्री रुग्णालय गाठून संबधित यंत्रणेला धारेवर धरले. नवजात बाळाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांना सोडू नका,त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे.