धक्कादायक! बुलडाण्यातील कोविड हॉस्पिटलचा झालाय बार; अन् म्हणे आम्ही कोविडच्या नव्या व्हेरींएंटला सामोरे जायला सज्ज; बुलडाणा लाइव्हच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यात भलत्याच गोष्टी....
Updated: Dec 27, 2023, 16:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोविडच्या नव्या व्हेरीयंटने देशवासीयांच्या हृदयात धडकी भरवलेली असतांनाच बुलडाणा जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय..कोविड काळात जे हॉस्पिटल अनेकांसाठी आधार ठरल होत त्या हॉस्पिटलचा आता अक्षरशः बार झाला की काय असा प्रश्न व्हावा इतपत तिथली परिस्थिती बेकार झाली आहे..बुलडाणा लाइव्ह च्या कॅमेऱ्यात तिथल्या धक्कादायक प्रकार कैद झालाय..दारूच्या बाटल्या, भरलेले ग्लास अन् दुर्गंधी असा सारा प्रकार तिथे दिसून आला...
बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड काळात कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले होते. सध्या तिथे स्त्री रुग्णालय सुरू करण्यात आले असले तरी इमारतीच्या एका भागात आपत्कालीन परिस्थितीसाठी १०० खाटांचे हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहे. दरम्यान सध्या कोविडच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत, शेजारच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य केंद्र सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र बुलडाणा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा झोपेत असल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या पाहणीत समोर आले.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या हॉस्पिटल मध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. अचानक कोविडचा रुग्ण आढळलाच तर जिल्हा यंत्रणेची तारांबळ उडण्याची शक्यता आहे..जिल्ह्यात २४ डिसेंबर पासून कोविड तपासण्या सुरू करण्यात आल्या असून आतापर्यंत २७२ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत, अद्याप एकही रुग्ण आढळला नाही..