धक्कादायक! जानेफळ परिसरात पाऊस धो धो कोसळला;उटी येथे ६० वर्षी व्यक्ती नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला; शोध सुरू...

 

मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,२१ जूनच्या सायंकाळी मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात धो धो पाऊस कोसळला. यावेळी उटी येथे नाल्याला आलेल्या पुरात ६० वर्षी व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंदा बळवंता साबळे(रा. उटी, ता.मेहकर) असे पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 जानेफळ परिसरात काल २१ जून च्या सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. उटी येथील आनंदा बळवंता साबळे हे संडासला जात होते, पुलावरून वाहत्या पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही त्यामुळे ते वाहून गेले. काल रात्रीच महसूल व पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. रात्रीपासून सरपंच सुरेश काठोळे, जानेफळ पोलीस महसूल प्रशासनाचे कर्मचारी शोधमोहीम राबवत आहेत,अद्याप आनंदा बळवंता साबळे यांचा शोध लागला नाही.