धक्कादायक! बुलडाण्यात मध्यरात्री पोलिसांनी ट्रक थांबवला! पाहता तर काय .. १६ गौवंशांची कत्तलीच्या उद्देशाने करत होते वाहतूक ! जळगावच्या शेख कलीमसह तिघे ताब्यात

 
Psb
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल २९ जानेवारीच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक मोठा चुकीचा प्रकार दिसला. त्यामध्ये मलकापूरच्या दिशेहून येणाऱ्या आयशर ट्रकात १६ गौवंशीय जनावरांची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. शेख कलीम शेख युसुफ, इमरान खान नवाब खान, शेख आरिफ शेख नाजिर अशी आरोपींची नावे आहे. तिघेही जळगाव येथील रहिवासी आहे.
ॲड
                                जाहिरात 👆
बुलढाण्यातील मलकापूर रोडवर मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी तपासणीसाठी भरधाव वेगाने येत असलेला आयशर ट्रक (एमएच १९सी.वाय३३९८क्रमांकाचा)थांबवला. पाहता तर काय! त्यात १६ गोवंशीय जनावरे आढळताच पोलीसांना धक्काच बसला. त्यांनतर पोलिसांनी ट्रक चालकासह दोघांची झडती घेतली, परवाण्याची विचारपूस केली तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा वैद्य परवाना मिळाला नाही त्यामुळे सदर वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय शहाजी रुपनार करत आहेत.