धक्कादायक! बुलडाण्याच्या तरुणाचा ओरिसात शॉक लागून मृत्यू; गणपती आगमनाच्या मिरवणुकीत झेंड्याच्या लोखंडी पाईपचा विजेचा तारांना झाला स्पर्श! MSC ची योगाचे शिक्षण घेत होता..

घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद! पहा व्हिडिओ...

 
dfkdjflsd
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीत हातातील झेंड्याचा लोखंडी पाईप विजेच्या तारांना लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओरिसा राज्यातील कटक येथे ही घटन घडली. मृत्यू झालेला तरुण बुलडाणा तालुक्यातील डोंगरशेवली येथे राहणारा आहे. सोहम भगवान सावळे(२४) असे तरुणाचे नाव आहे.

add

सोहम कटक येथे एमएससी योगाचे शिक्षण घेत होता. काल श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. एका मोठ्या वाहनातून मिरवणूक सुरू असताना सोहम हातातील भगवा ध्वज फडकवत होता. त्याच वेळी वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना त्याच्या हातातील लोखंडी पाईप चा स्पर्श झाला आणि काही क्षणात तो खाली कोसळला. त्याला स्थानिक हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ देखील कॅमेऱ्यात कैद झाला असून तो काळजी हेलावणारा आहे. या घटनेमुळे बुलडाण्यासह डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे.