धक्कादायक! सोळा वर्षाच्या मुलीला बनविले लेकराची आई! मंदिरावर लग्न करून थाटला संसार;पोरीचे माय बापही आरोपीच्या पिंजऱ्यात! धाड पोलिसांत गुन्हा दाखल

बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): एका २१ वर्षीय युवकाचं गावातीलच १५ वर्षांच्या मुलीवर प्रेम जडलं. सात जन्मसोबत राहण्याच्या आनाभाका घेऊन दोघांनीही गावातून पलायन केलं. एका धार्मिक स्थळावर देवीच्या साक्षीने लग्न केलं. नव्हे तर एकमेकांसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलीने १६ व्या वर्षी एका गोंडस बाळाला जन्मही दिला. मात्र, प्रसुतीदरम्यान या बालविवाहाचं बिंग फुटलं आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 'एमएलसी ' युवका व अल्पवयीतेच्या आई-वडिलांविरोधात लैंगिक अत्याचार, पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्दा दाखल झाला. धाड पोलीस स्टेशन हद्दित येणाऱ्या एका गावात ही घटना घडली.
धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या पाच किलो मिटर अंतरावर असलेल्या एका गावातील २१ वर्षीय युवकाचं गावातीलचं १५ वर्षीय मुलीसोबत प्रेम होतं. युवकाच्या कुटुंबियांचा लग्नाना विरोध असल्याने दोघांनी वर्षभरापूर्वी गावातून पलायन केलं. काही दिवस ईतरत्र वास्तव्य केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी बुलडाणा तालुक्यातील एका धार्मिक स्थळावर देवीच्या साक्षीने लग्नगाठ बांधली आणि हे जोडपं परत गावात आई-वडिलांकडे वास्तव्यास गेलं. अशातच पीडितेला गर्भधारना झाली. पंधरा दिवसांपूर्वी कुटुंबियांनी पीडितेला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीसाठी भरती केलं. मुलीने एका गोंडस बाळाला जन्मही दिला.
दरम्यान, बाळाला जन्म देणारी माता कुमारीका असल्याची बाब उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांना बुलडाणा शहर पोलिसांशी संपर्क साधून एमएलसी दिली. गुन्हा धाड पोलीस स्टेशन हद्दितील असल्याने बुलडाणा शहर पोलिसांनी सदर एमएलसी धाड पोलिसांकडे वर्ग केली. ठाणेदार मनीष गावंडे यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून पीडितेचा जबाब नोंदविला.
पीडित मुलीच्या जबाबावरुन आरोपी पतीसह पीडितेच्या आई- वडिलांविरोधात भादंविचे कलम ३७६, ३७६ (२), (एन), ३७६ (३), ३४ सहकलम ४ (२), ६, पोक्सो, सहकलम ९,१०,११ बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीस अटक करण्यात आली असुन उर्वरीत दोन्ही आरोपी फरार आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार गावंडे यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस करीत आहेत.
आई-वडिलांनीच लाऊन दिलं लग्न..
दरम्यान, पोलिसांनी सामान्य रुग्णालय गाठून पीडितेचा जबाब घेतला. त्यामध्ये पीडितेने माझ्या आई-वडिलांनी माझ्या मर्जीनेच लग्न लाऊन दिल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्या देशात बालविवाहाला बंदी असल्याचे ज्ञात असतांनाही मुलीच्या ईच्छेपुढे लग्न लाऊन देण्यासाठी हतबल होण्याची नव्हे तर गुन्ह्यात आरोपी होण्याची वेळ माता-पित्यावर आली आहे.(सोर्स: दैनिक पुण्यनगरी)