शिवशाही बस आणि ट्रकचा अपघात! बसमध्ये होते ३३ प्रवाशी; मोताळा तालुक्यात आज सकाळची घटना
Aug 10, 2024, 12:23 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मोताळा तालुक्यात आज सकाळी शिवशाही बस आणि ट्रकचा अपघात झाला. परडा फाट्याजवळ वळणात ट्रक शिवशाही बसवर आला, मात्र चालकाने प्रसंगावधान राखले, बस रस्त्याच्या कडेला झाडावर कोसळली..त्यामुळे ३३ प्रवाशांचा जीव वाचला. बस मलकापूर आगाराची होती, संभाजीनगर येथे जात होते.
प्राप्त माहितीनुसार एम एच ०६, ३५६१ क्रमांकाची बस छत्रपती संभाजी नगर कडे जात होती. सकाळी ११ वाजता परडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणारा ट्रक बसवर आला, पाऊस आणि चिखल असल्याने बसचे ब्रेक देखील लागले नाहीत. मात्र चालक एस एन बोर्डे यांनी प्रसंगावधान राखले, बस रस्त्याच्या कडेवरील झाडावर आदळल्याने प्रवाशांचा जीव वाचला.