शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबिर! संदीप शेळकेंचा पुढाकार...

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवा नेतृत्व संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे. 
Budhvat
     Advt👆
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले होते. त्यानुसार या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार आहे. रक्तदात्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष लखन गाडेकर यांनी केले आहे.
  रक्तदान ही काळाची गरज आहे. रक्ताचा एक थेंब रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. निरोगी समाजाचे स्वप्न साकार करायचे असल्यास रक्तदानासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. गेल्या २३ वर्षांपासून राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी रक्तदान चळवळीस वाहून घेतले आहे. एकाच वेळी राज्यभरात जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या त्यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.