छत्रपती शिवरायांच्या अवमानामुळे शिवभक्त संतप्त! चिखली शहरात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद; हाणामारी, दगडफेकीच्या अफवा..! मेरा खुर्दच्या समाजकंटक औरंगजेबप्रेमींच्या निषेधाचे सुर...
Feb 21, 2023, 15:28 IST

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील काही समाजकंटकांना औरंगजेबाचा पुळका आल्याने त्यांनी अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे स्टेटस् ठेवले होते. या प्रकारामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. आज,२२ फेब्रुवारीला विविध राजकीय पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांनी चिखली बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला समस्त चिखलीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
जाहिरात 👆
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे काल, २० फेब्रुवारीच्या सायंकाळी तणाव निर्माण झाला होता. काही दुकानांची व लोटगाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून तगडा बंदोबस्त तैनात केला. "त्या" चार औरंगजेब प्रेमींना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून निषेधाचे सुर उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी चिखली शहर बंदच्या केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सध्या चिखली कडकडीत बंद आहे. चिखली शहरात काही ठिकाणी मारहाण , दगडफेक झाल्याच्या अफवा पसरत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या चिखलीत तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.