शेतकी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी ईश्वर इंगळे अविरोध

 
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी शेषराव इंगळे व उपाध्यक्षपदी राजीव सावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
चिखली तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी अध्यक्षपदी शेषराव इंगळे उत्रादा यांची तर उपाध्यक्षपदी राजीव सावळे यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीनंतर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहल बोंद्रे तसेच उबाठा शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला. यावेळी उत्रादाचे माजी पोलीस पाटील भगवान इंगळे, प्रल्हाद इंगळे, विजय इंगळे, सिताराम इंगळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती.