किचनमध्ये स्वयंपाक करत होती... तो मागच्या दरवाजाने आला अन्‌ तिला घेऊन गेला!; खामगाव शहरातील धक्कादायक घटना

 
खामगाव शहरातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; कॉम्‍प्‍युटर क्लासला गेली होती…
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील १७ वर्षीय मुलीचे २१ वर्षीय तरुणाने मागील दरवाजाने येऊन अपहरण केले. ही घटना १३ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास चांदमारीतील फाटकपुरा भागात घडली. काल, १४ जानेवारीला मुलीच्या आईने खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सय्यद राजिक सय्यद सादिक (२१, रा चांदमारी, खामगाव, ह. मु. पुणे) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी घरात स्वयंपाक करत होती. तिची आई घरासमोरील अंगणात बसून साडीला डायमंड लावण्याचे काम करत होती. थोड्या वेळाने मुलीच्या आईने मुलीला आवाज दिला. मात्र घरातून कोणताही आवाज न आल्याने घरात जाऊन पाहिले असता मुलगी गायब झाल्याचे दिसले. आजूबाजूच्या मोहल्यात, नातेवाइकांकडे सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने सय्यदनेच मुलीला मागील दरवाजाने येऊन फूस लावून पळवून नेले, अशी तक्रार मुलीच्या आईने पोलिसांत केली.