स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शरद पोंक्षे यांचे आज बुलढाण्यात व्याख्यान! सावरकरांची जन्मभूमी भगुरवरून प्रा. डॉ. मृत्युंजय कापसेंची विशेष उपस्थिती
Jan 28, 2024, 12:40 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
स्थानिक गर्दे वाचनालय येथील सभागृहामध्ये ग्रंथमित्र स्व. भास्करराव देशपांडे यांच्या दहाव्या स्मृतीप्रित्यर्थ अभिनेते तथा व्याख्याते शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन गर्दे वाचनालय बुलढाणा व भगवान परशुराम जन्मोत्सव समिती यांच्या वतीने रविवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. या व्याख्यानास स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथील जन्मभूमी न्यासचे प्रा. डॉ. मृत्युंजय कापसे यांची विशेष उपस्थिती लागणार आहे.तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी व सावरकरांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
जाहिरात 👆
कार्यक्रमाचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, उद्घाटक म्हणून बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड , गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष गोकुल शर्मा व प्रा.डॉ. मृत्युंजय दिनेश कापसे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी न्यास, भगुर (नाशिक) यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.