सात वर्षीय सिद्धीने सर केले कळसूबाईचे शिखर! जिद्दीमुळे सर्वात उंच शिखराला गवसणी

 
Tiranga
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील जेमतेम सात वर्षांच्या जिजाऊंच्या लेकीने कळसुबाई च्या शिखराला गवसणी घातली! २६ जानेवारीच्या शुभमुहूर्तावर तिने हा पराक्रम केला.
Add
                     जाहिरात 👆
सिद्धी विठ्ठल सोनुने असे या वीर बालिकेचे नाव आहे. गिर्यारोहणचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना महाराष्ट्र् मधील सर्वात उंच शिखराला गवसणी घातली. वडिल विठ्ठल सोनुने यांच्यासह २६ जानेवारीला सकाळी ८ वाजता तिने शिखर चढण्यास सुरुवात केली. अवघ्या दीड तासात तिने आपले उद्धिष्ट गाठले. शिखरावर तिने तिरंगा फडकवला तेंव्हा तिच्यासह वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
   
   बुलढाणा तालुक्यातील साखळी येथील रहिवासी विठ्ठल सोनुने शेतीचे काम करतात. ती बुलढाणा येथील विवेकानंद गुरुकुंज मध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी आहे. शेतातील कामे, पायी चालणे व नियमित पोहणे हाच तिचा सराव आहे. परिश्रमाला जिद्दीची जोड देत तिने आपले उद्धिष्ट गाठले. वडील व क्रीडाप्रेमी मुख्याध्यापक गजानन इंगळे यांनी सतत प्रोत्साहन दिले.