समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव क्रेटा उभ्या आयशरला धडकली! पत्नीचा जागीच मृत्यू; पती गंभीर! पुण्यावरून नागपूरला जात होते; मेहकर तालुक्याच्या हद्दीत झाला अपघात

 
accident
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृध्दी महामार्गावर आज,१८ एप्रिलच्या दुपारी भीषण अपघात झाला. पुण्यावरून नागपुरला जात असलेल्या दांपत्याचे क्रेटा वाहन उभ्या आयशरला धडकले. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे.
 

 प्राप्त माहितीनुसार क्रेटा वाहन (क्रमांक MH 31, 6622) ने प्रवीण हिंगणीकर (५९) व त्यांची पत्नी(४५) पुण्यावरून नागपूर जात होते. दुपारी तीनच्या सुमारास मेहकर तालुक्यातील कल्याणा नजिक उभ्या आयशर वाहनाला त्यांची गाडी धकडली. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला . अपघातात हिंगणीकर यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर ते स्वतः गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींवर मेहकरतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.