खळबळजनक; भिंतीवरून चढल्या अन् बंगल्यात शिरल्या! बुलढाण्यात न्यायाधीशांच्या बंगल्यात दोन महिलांकडून...

 
Kkk
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यातून दोन महिलांचा चोरीचा कट उधळला. प्रकरणी पोलीसांनी दोन्ही महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.  
    १६ जून रोजी दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खटी यांच्या निवासस्थानी दोन महिला भिंतीवरून आत शिरल्या. दरम्यान, शिपाई शेळके यांनी दोन्ही महिलांना विचारणा केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तुम्ही आत का आल्या? असे विचारले असता त्या दोघींनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यांनतर दोघी चोरी करण्याच्या उद्देशाने स्टोर रूममध्ये गेल्या. त्यावेळी शिपाई शेळके यांनी पोलिसांना ही माहिती दिली. बुलढाणा पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठले. आशा दिलीप लावाडकर ( ४० वर्ष) व अरुणा रमेश लावाडकर (४५ वर्ष) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून समज देवून त्यांची मुक्तता करण्यात आली. याआधी ठाणेदार नरेंद्र ठाकरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जावून आढावा घेतला.