खळबळजनक BREAKING! बुलडाण्यात एकाच कुटुंबातील तिघांची तब्येत अचानक बिघडली; तोंडातून फेस येत होता, दम घोटत होता...नेंमक काय झालं

 
Crime
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा शहरातील सराफ लाईन परिसरातील आंबेकर परिवारात आज २२ डिसेंबरच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास एक विचित्र घटना घडली. त्यामध्ये कुटुंबातील तिघांची अचानकपणे प्रकृती बिघडल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.
झाले असे की, कुटुंबातील आरती आंबेकर (३२ वर्ष) यांना गॅसगिझर मुळे तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (सपोकेशन) दम घोटणे सुरू झाले. त्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असतानाच त्याखाली कोसळल्या.. हे दृश्य पाहताच (आई-वडील) ज्योती आंबेकर, विनायक आंबेकर हादरून गेले. ते सुद्धा जमिनीवर कोसळले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी ॲम्बुलन्स च्या साह्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सदर प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हे सर्व घडले असताना शहरात एकच खळबळ उडाली होती की , कुटुंबातील सर्वांनी विष प्राशन केले आहे. मात्र तसा कुठलाही प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.