खळबळजनक.! चिखलीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचा निर्णय घेतला; राहत्या घरात गळफास घेतला! असं काय झालं?

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन नगर परिसरात आज,२५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आंचल नितीन साळवे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंचल ने घरात गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा तिची आई घरात भांडे घासत होती. आंचल ने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिला तातडीने शहरातील नलिनी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.वयाच्या १६ व्या वर्षी अस काय घडल की आंचलं ने एवढा टोकाचा निर्णय घेतला याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.