खळबळजनक! अनैतिक संबंधात तिचा नवरा अडसर ठरत होता! प्रियकराने गळा आवळून खून केला! लोणार तालुक्यातील पळसखेडची घटना!
हुशारी दाखवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडलेच! जिल्ह्यातला चालू वर्षातला ३१ वा MURDER...
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनैतिक संबंधातून कधी काय होईल याचा नेम नाही..बहुतांश गुन्हे अनैतिक संबंधातून घडतात, काही वेळा असे संबंध जीवावर बेततात..लोणार तालुक्यातील पळसखेड येथे एका बिचाऱ्या नवऱ्याला पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे प्राणास मुकावे लागले..पत्नीच्या प्रियकराने त्याचा गळा आवळून खून केला..लोणार पोलिसांनी अतिशय तल्लख बुद्धीने या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
राजाराम गजानन जायभाये (३०, रा.पळसखेड ता.लोणार) असे मृतकाचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव संतोष थोरवे (३७,रा. पळसखेड,ता.लोणार) असे आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष थोरवे याचे मृतक राजाराम च्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. मात्र राजाराम या संबंधात अडसर ठरतोय असे संतोष याला वाटत होते..
२८ ऑक्टोबरच्या सायंकाळी राजाराम संतोष याच्या शेतात ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी गेला होता. अर्धेअधिक शेताची मशागत झाल्यावर राजारामला शेतात झोप लागली, यावेळी संधीचा फायदा घेत संतोष राजाराम च्या छाताडावर जाऊन बसला आणि त्याने गळा आवळून संतोषचा खुन केला. २९ ऑक्टोबरच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. मात्र आरोपी संतोष हा जसे काही आपल्याला काहीच माहीत नाही अशा थाटात वावरत होता..
घटनेची माहिती लोणार पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांच्या तपासाची दिशा काय असेल याचा सुगावा घेण्यासाठी आरोपी संतोष थोरवे तिथेच उपस्थित होता. दरम्यान एपीआय युवराज रबडे यांनी संतोष थोरवे याच्या हाताच्या बोटाला झालेली जखम हेरली. संशय व गोपनीय माहितीच्या आधारे संतोष थोरवे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली..आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संतोष थोरवे याने पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. लोणार पोलीस ठाण्यात मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालू वर्षातील हा ३१ वा खून आहे..