नगरपालिका निर्मित सेल्फी पॉईंटची अवस्था पाहून लोणारकर म्हणतात.. हमारा "दिलं तूट गया"!

 
लोणार
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: सचिन गोलेच्छा) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराने जगाच्या पाठीवर नावलौकिक मिळवला आहे. त्यामुळेच लोणार शहराला सुद्धा पर्यटनाच्या रांगेत अग्रनीय स्थान मिळाले आहे. त्याच लोणार शहरात काही दिवसांपूर्वी
 "I लव्ह LONAR" असा सेल्फी पॉईंट नगरपरिषदेकडून बनविण्यात आला होता. विशेष म्हणजे लोणारचे तत्कालीन मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या संकल्पनेतून टाकाऊ वस्तुपासून या सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली होती. आता सद्यस्थितीत त्या सेल्फी पॉइंटची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.
आय लव्ह लोणार असे इंग्रजीत लिहिलेल्या पॉइंटचे लव्हचे चिन्हच तुटून पडले आहे,त्यामुळे दिलं तूट गया.. असं दोनार्थी म्हणता येत आहे. लोणार शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडावा या हेतूने सेल्फी पॉइंट बसवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी केदारे म्हणाले होते की, अश्या पद्धतीने पॉइंट आणखी तीन - चार ठिकाणी तयार करायचे आहेत, मात्र प्रशासकीय बदलीमुळे तेथून ते दुसऱ्या ठिकाणी गेले. एका सेल्फी पॉइंटची अवस्था अशी झाली आहे की,इतर ठिकाणी काय विचार करणार? असा सवाल लोणारकर उपस्थित करतात. शहरातील सौंदर्यकृतीचे संवर्धन करणे नागरिकांचे देखील काम आहेच.