विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनो ,बातमी तुमच्या कामाची! जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मोठी अपडेट ....

 
Vvbb
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विज्ञान शाखेत अकरावी आणि बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विज्ञान शाखेत अकरावी आणि बारावीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच अभियांत्रिकी पदवी, पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या आणि उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते.
यासाठी जिल्ह्यातील विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज महाविद्यालयातर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समिती कार्यालयात सादर करावे लागणार आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळेल. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला नाही त्यांनी जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र प्राप्त करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.