परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती! अर्ज कसा करायचा जाणून घ्या....

 
cgdyyf

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राज्य शासनाकडून राज्यातील अनुसुचित जमातीच्या १० विद्यार्थ्यांना  परदेशात  पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे उपलब्ध आहे. दि. ३० जून २०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून कार्यालय प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला  येथे सादर करावे लागणार आहे. अर्ज करण्यारिता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.