म्हणे "मी मासिक पाळीचा ईलाज करतो"! विवाहितेला आतल्या खोलीत नेले अन् भलताच कार्यक्रम केला! विवाहितेची मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार...

 
Jxjxk
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २५ वर्षीय विवाहिता तिच्या आत्याच्या घरी गेलेली होती. तिला मासिक पाळी आलेली असल्याने पोट दुखत असल्याचे ती आत्याला सांगत होती. त्याचवेळी त्या दोघींच्या गप्पा विवाहितेच्या आत्याच्या पुतण्याने ऐकल्या. विवाहितेची आत्या बाजूला गेल्यावर तो तिथे गेला. "मी मौलवी असल्याने तुझ्या मासिक पाळीचा इलाज करतो" असे म्हणत त्याने विवाहितेला आतल्या खोलीत नेले. तिच्या अंगावरील कपडे काढून तिला विवस्त्र केले आणि त्याचे मोबाईल मध्ये शूटिंग केले. विवाहितेला त्याची इलाज करायची पद्धत आवडली नाही, तिने नकार दिल्याने तो तिथून निघून गेला. मात्र त्यानंतर "ते" काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर विवाहितेच्या नवऱ्याला फोन करून "तुमच्या बायकोचे माझ्याशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले" त्यामुळे विवाहितेच्या नवऱ्याने गरोदर बायकोला माहेरी नेऊन घातले,दोघांचा आता घटस्फोट झालेला आहे. संसारात विष कालवणाऱ्या विरोधात विवाहितेने आता पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. उबेद उर्फ नजीर शबाब कुरेशी( रा. चीचांबा भर, ता.रिसोड) असे आरोपीचे नाव आहे.
पिडीता नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्याने सध्या माहेरी मेहकरात राहते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार २०१८ मध्ये तिचे लग्न झाले होते. तिचा नवरा मुंबईत मजुरी करायचा. पगार कमी असल्याने आर्थिक अडचण असल्याने ती कधी नवऱ्याजवळ मुंबईत तर कधी माहेरी मेहकरात रहायची. २०१८ मध्ये पीडित विवाहिता तिच्या आत्याकडे रिसोड तालुक्यातील चीचांबा भर येथे गेली होती. विवाहितेच्या आत्याचा मुलगा मरण पावल्याने तिच्या आत्याने पुतण्या उबेद याला मुलगा मानले होते. उबेद सोबत विवाहीतेची ओळख झाली होती. दरम्यानच्या काळात विवाहितेला मासिक पाळी आल्याने तिचे दुखत होते. ही बाब तिने आत्याला सांगितली. दोघींच्या गप्पा उबेदने ऐकल्या. त्यानंतर " मी मौलवी असल्याने तुझ्या मासिक पाळीचा इलाज करतो" असे म्हणत उबेदने विवाहितेला आतल्या खोलित नेऊन तिला विवस्त्र केले, त्याचे व्हिडिओ शूटिंग केले. विवाहितेला इलाज करण्याची पद्धत आवडली नसल्याने तिने सांगितले, त्यामुळे उबेद तिथून निघून गेला..
 दुसऱ्या दिवशी बलात्कार...
दुसऱ्या दिवशी उबेदने विवाहितेला फोन करून इलाज करायला त्याच्या घरी बोलावले. मात्र तिने इलाज करायचा नसल्याचे सांगितले, तेव्हा तुझे कालचे व्हिडिओ फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करील अशी धमकी त्याने दिली.त्यामुळे विवाहितेची आत्या शेतात गेल्यावर ती उबेदच्या घरी गेली. तेव्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उबेदने तिच्याशी बळजबरी संभोग केला. या घटनेनंतर विवाहिता ४ दिवस आत्याच्या घरी होती तेव्हा त्याने वारंवार तिचा उपभोग घेतला..
संसारात विष कालवले..
दरम्यान या प्रकारानंतर विवाहिता नवऱ्याकडे मुंबईला गेला. तक्रारीत म्हटल्यानुसार ती नवऱ्यापासून गरोदर होती. तेव्हा उबेदने विवाहितेच्या नवऱ्याला फोन करून "आधी झालेलं" सगळ सांगितलं. यामुळे नवऱ्याने विवाहितेला कायमस्वरूपी माहेरी आणून सोडले. यानंतर उबेद विवाहितेला कॉल केला करून परेशान करत होता, कधी रिसोड, कधी मेहकर शहरातील हॉटेल तर कधी डोणगाव रोडवरील मोकळ्या जागेत नेऊन तिची इज्जत लुटत होता..
अन् गावभर बोभाटा झाला...
दरम्यान गेल्यावर्षी एके दिवशी दुपारी उबेदने विवाहितेला मेहकर येथील घरकुल परिसरात बोलावले, तिथे तिच्यावर भरदुपारी बलात्कार केला. यावेळी तिथल्या स्थानिक लोकांनी दोघांना शारीरिक संबंध सुरू असताना पकडले. त्यामुळे नंतर गावभर दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा होऊन बदनामी झाल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे..
 पंचकमेटी बसली अन्..
दरम्यान या घटनेची वाच्यता झाल्यानंतर विवाहिता व उबेद या दोघांचेही नातेवाईक व समाजातील प्रतिष्ठित मंडळींची पंचकमिटीची बैठक झाली. दोघांचेही कोर्टात लग्न लावून द्यायचे पंचकमेटीच्या बैठकीत ठरले. १२ डिसेंबर २०२२ ला ठरल्याप्रमाणे उबेद,विवाहिता व नातेवाईक असे बुलडाणा येथे कोर्ट मॅरेज करण्यासाठी जमले. मात्र ऐनवेळी उबेदच्या चाचाने " आधीच्या नवऱ्यापासून कोर्टात फारकती घे,तरच लग्न होईल" असे म्हटल्याने त्यादिवशीचे नियोजित लग्न मोडले. दरम्यान विवाहितेने ६ महिन्यांपूर्वी आधीच्या नवऱ्यापासून कोर्टात घटस्फोट घेतला. पंचकमिटी उबेदच्या घरी गेली तेव्हा उबेद व त्याचे वडील घरी नव्हते. विवाहित त्याला फोन करत होती तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. ३ नोव्हेंबर २०२३ ला पीडिता उबेदच्या घरी गेली तेव्हा उबेद घरी नव्हता, त्याच्या आईने तिला घरात घेतले नाही. अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर विवाहितेने मेहकर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.