संत निरंकारी मंडळाचे मिशन 'वननेस' ! चिखली पोलीस वसाहतीमध्ये राबविले वृक्षारोपण. ठाणेदार संग्राम पाटील म्हणाले, मिशनचे कार्य मानव जातीसाठी मोलाचे!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभरात वननेस वन मोहीमेअंतर्गत वृक्षारोपण राबविण्यात येत आहे. चिखली येथे ११ ऑगस्ट रोजी पोलीस वसाहत परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी ठाणेदार संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  Bhutekar
Advt 👆
संत निरंकारी मिशन एक अध्यात्मिक विचारधारा आहे. संपूर्ण जगभरात मानव जातीच्या कल्याणासाठी मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. मिशनच्या विद्यमान प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षाजी यांच्या आशीर्वादाने वेळोवेळी लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने पर्यावरण संरक्षण उद्देशाने २०२१ मध्ये "वननेस वन " ही मोहीम सुरू करण्यात आली. वृक्ष सावली देताना, कुठल्याही प्रकारचा भेद पाहत नाही. या संकल्पनेने सर्व जाती धर्मातील माणसांनी एकत्र येवून वृक्षारोपण केले पाहिजे. हा या मोहिमेचा हेतू आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने तसेच सद्गुरु सुदिक्षा माताजी आणि राजपिताजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विश्वात हे कार्य सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे रविवारी स्थानिक पोलीस वसाहत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहर ठाणेदार संग्राम पाटील, गटविकास अधिकारी सुरडकर, कर्नल गवई तसेच निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक शालिग्राम चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासह निरंकारी मिशनचे अनुयायी तसेच सेवादल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत निरंकारी मिशनचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन ठाणेदार संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.