तारुण्य हेच परिवर्तन करू शकते संदीप शेळकेंचे प्रतिपादन! निमित्त जानेफळ एक्स्प्रेसच्या वर्धापन दिनाचे

 
Cvbm
मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): या जगात जे बदल झाले ते सर्व तरुणांनी केले आहेत. त्यामुळे बदलत्या काळात तरुणांनी सजग राहून कार्य करावे. आमच्या सामान्य कुटुंबातील तरुण जेव्हा एखाद्या पदावर पोहोचतात, तेव्हा त्या तरुणांनी स्वतःतील संवेदनशीलता कायम ठेवावी. अडचणीत असलेल्या एखाद्या गरजूला मदत करावी तरच खऱ्या अर्थाने आमचे शिक्षण कारणी लागले असे भावनिक मत राजश्री शाहू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी मांडले. जानेफळ एक्सप्रेसच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अनिकेत सैनिकी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव गवई तर प्रमुख अतिथी म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यकारणी सदस्य पत्रकार सिद्धेश्वर पवार, मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता उमाळे, जानेफळ येथील जेष्ठ पत्रकार सैय्यद महेबूब, रयत संघटनेचे राज्य प्रवक्ते जितू अडेलकर, पत्रकार गजानन दुतोंडे, पत्रकार श्रीकृष्ण काकडे, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष अवसरमोल, बुलडाणा लाइव्ह चे पत्रकार अनिल मंजूळकर,जानेफळ प्रेस क्लबचे अध्यक्ष दिलीप डोंमळे,माजी सरपंच संतोष तोंडे, सुरेश वडणकर, मुख्याध्यापक रत्नाकर गवारे, मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विजय मोंढे यांनी केले.
 यानंतर मान्यवरांच्या हस्ते जानेफळ एक्सप्रेसच्या अंकाचे विमोचन करण्यात आले. त्या सत्कारानंतर गुणवंतांचा गुण गौरव करण्यात आला. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड झालेल्या कु. सुरेखा रामेश्वर सपकाळ, कु राजश्री रमेश चौधरी यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या गोपाल नारायण चौडकर तर पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल नागेश संतोष सुर्वे, प्रदीप प्रल्हाद मुरडकर, धीरज श्रीकिसन इंगळे, शुभम विजय फोलाने यांचा सत्कार करण्यात आला.तसेच १२ वी चा गुणवंत गौरव खराटे, प्रशांत खोलगडे, शिवाजी विद्यालय जानेफळचा पाचपवार यांचा तर सर्वधर्मसमभाव दाखवत रणजित वानखेडे, बंडू जाधव यांनी काढलेल्या कावड यात्रेबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच लक्ष अकॅडमि आणि अनिकेत सैनिकी शाळा साखरखेर्डा येथील पोलीस म्हणून निवड झालेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश बन्सी उतपुरे यांचा सत्कार करण्यात आला. व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सिद्धेश्वर पवार तर पत्रकार संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दत्ता उमाळे यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर ए. आर. टी. ओ. राजश्री सपकाळ आणि सुरेखा सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
 त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी एक पत्रकार योग्यवेळी समाजाच्या कसा कामी पडतो हे सोदाहरण स्पष्ट केले. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांचा कसा फायदा झाला हे त्यांनी स्पष्ट केले.अर्जुनराव गवई यांनी दातृत्व दाखवत जानेफळ एक्सप्रेसला दैनिक करण्यासाठी ५ लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले. आपण सैनिक शाळेच्या माध्यमातून आज देशाच्या प्रत्येक विभागात सैनिक पाठविले आहेत व याचा अभिमान असल्याचे ते बोलले.त्यानंतर लोकमतचे तालुका प्रतिनिधी दत्ता उमाळे यांनी पत्रकारांवर जेव्हा संकट येतील तेव्हा तेव्हा मी तन-मन धनाने त्यांना साथ देईल अशी ग्वाही दिली.त्यानंतर अध्यक्षीय भाषणात संदीप शेळके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करत, ज्या तरुणाला आपल्या आई-वडिलांच्या दुःखाची जाणीव असते ते तरुण कधीही भरकटत नाही, ते आपल्या ध्येयावर ठाम असतात, जगात आजपर्यंत जे जे परिवर्तन झाले ते तरुणांनी केलेले आहे. त्यामुळे या तरुणांना शाबासकीची आणि कौतुकाची थाप देण आवश्यक आहे. असे मत नोंदवले.या कार्यक्रमाला तालुक्यातून सादिक कुरेशी,अन्सार शेख,सतीश मवाळ, प्रमोद मिश्रा, विशाल फितवे, रवींद्र सुरुशे,अंकुश वानखेडे, गणेश सवडतकर, राजू केदारे, संतोष सोनपसारे,आयाज शहा,शेख यासिन , शेख युनूस उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे व आदर्श शिक्षक विजय मोंढे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन संपादक किशोर इंगळे यांनी केले.मुख्य संपादक अशोक शेजुळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जानेफळ एक्सप्रेस चे मुख्य संपादक अशोक शेजुळ, संपादक किशोर इंगळे, निवासी संपादक कृष्णा हावरे, सहसंपादक सचिन खंडारे यांनी परिश्रम घेतले.