निवडणुकीनंतर देखील संदीप शेळके ॲक्टिव! लवकरच जिल्हाभेट दौऱ्यात करणार 'कृतज्ञता संवाद'!

 
Vbbv
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा  मतदारसंघाची लोकसभा निवडणूक पार पडली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या शेळकेंना जिल्हाभरातून  खूप प्रेम मिळाले.  विकासाचे व्हिजन असल्यामुळे जिल्हा वासियांनी  संदीप शेळके यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. निकाल जो लागायचा तो लागेल मात्र निवडणूक संपली तरी संदीप शेळके मात्र चांगलेच ॲक्टिव दिसत आहे. जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल, प्रतिसादाबद्दल आभार मानण्यासाठी संदीप शेळके आता पुन्हा एकदा सामान्य जनतेमध्ये पोहोचणार आहेत. लवकरच 'कृतज्ञता संवाद' करण्यासाठी ते जिल्हाभेट दौरा करणार आहेत. 

  जिल्हा विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून संदीप शेळके यांनी वर्षभरापूर्वी वन बुलडाणा मिशन या राजकीय चळवळीची स्थापना केली. त्यांनतर  वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. लोकांच्या, तरुणांच्या, माता भगीनिंच्या अपेक्षा जाणून घेतल्या. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून  जिल्हा विकासासाठी काढलेल्या  परिवर्तन रथयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जनतेच्या मनात शेळके यांनी विकासात्मक परिवर्तनाचा दीप लावला. बुलडाणा जिल्हा विकसित कसा होईल या हेतूने अभ्यासपूर्ण  विकास धोरणे आखली.  निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेळके यांना जोरदार प्रतिसाद मिळाला गावोगावी संदीप शेळकेंचे जंगी स्वागत झाले. दरम्यान आता मतदारांचे आभार मानण्यासाठी संदीप शेळके लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघत आहेत.

निवडणुकीदरम्यान जिल्हा वासियांनी दिलेल्या प्रेमाचे आभार मानण्यासाठी संदीप शेळके पुन्हा एकदा जिल्ह्यातील जनतेची भेट घेत कृतज्ञता संवाद करणार आहेत. दरम्यान या कृतज्ञता संवाद दौऱ्याचा विस्तृत तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही, मात्र शेळके यांच्या या अभिनव दौऱ्याचे राजकीय वर्तुळात कौतुक होतांना दिसत आहे..