नव्या वर्षातही तेच..!जिल्ह्यातल्या २८ जणींनी आई वडिलांचा विचारच केला नाही! ढसा ढसा रडतायेत बिचारे..
Jan 19, 2024, 18:29 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील बेपत्ता होण्याचे सत्र काही थांबत नाही. नव्या वर्षात तर आणखी वेगाने ही संख्या वाढू लागली आहे. पोलिस प्रशासनच नव्हे तर समाजमनाला चिंतन करायला लावणारा हा प्रकार आहे. जिल्ह्यात नव्या वर्षांत आतापर्यंत बेपत्ता होण्याची ४५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यात २८ तरुणींचा समावेश आहे.
विशेष बेपत्ता होणाऱ्यांपैकी बहुतांश अविवाहित आहे. काही विवाहित महिला, पुरुषांनी देखील घर सोडल्याची प्रकरणे आहेत. काही प्रकरणांत विवाहित महिला मुलाबाळांना देखील घेऊन गायब झाल्या आहेत. बहुतांश प्रकरणात प्रमविवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने मुली प्रियकरासोबत गेल्या असा संशय पालकांना आहे, मात्र सगळीच प्रकरणे तशी नाहीत. काही प्रकरणात घरच्यांशी वाद झाल्याने, पटत नसल्याने अशी देखील कारणे समाविष्ट आहेत.
या झाल्या गायब..
बुलडाणा जिल्ह्यातून गायत्री सावळे(१८), दिव्या सुभाष घोंगटे (२०), वैष्णवी रमेश वानखेडे(१८), रोशनी भारत यादव(१८), शांता गौतम गवई(१८), रेणुका सोनुने(२२), प्रीती कुंडलिक शेळके(२१), निकिता बाळू बापट(२२), स्नेहल साहेबराव पाटील(२१), प्रियंका बबन गवई(१९) या तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे .